

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी,भंडारा -पवनी तालुक्यातील कोंढा वरून 4 किलोमीटर असलेल्या सेंद्रि खुर्द येथील ग्रामसेविका वट्टी मॅडम सतत गैरहजर व ग्रामस्थांशी उद्धट भाषेत बोलत असतात. अशा प्रकारची तक्रार खंडविकास अधिकारी पंचायत समिती पवनी यांच्याकडे शिवसेना वाहतूक शाखा पवनी चे अध्यक्ष होमराज गोविंदा उपरीकर यांनी एका लेखी पत्रकाद्वारे खंडविकास अधिकारी पवनी यांच्याकडे केलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेंद्रि खुर्द येथे वट्टी मॅडम यांची ग्रामसेविका म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे .कामकाजाच्या वेळी लोक ग्रामपंचायत मध्ये येतात परंतु मॅडम गैरहजर राहत असतात. त्यामुळे लोकांचे काम परिपूर्ण होत नसल्याने लोकांच्या भावना दुखावत आहेत .तसेच त्यांचे कडे येणारे गावातील लोक सरकारच्या योजना बाबत विचारणा केली असता त्यांना धमकीचे उत्तर देऊन त्यांना परत करीत असतात त्यामुळे लोकांच्या भावना कलुषित होऊन त् त्यांना अपमानित केले जाते.यांना ह्या नियुक्तीवरून कुठेतरी बदली करावी असे जनतेची मागणी आहे .त्याचप्रमाणे वट्टी मॅडम यांची बदली करून गावाला न्याय देण्याचे मागणी होमराज उपरीकर यांनी खंडविकास अधिकारी पवनी यांना 4 ऑगस्ट 2025 ला दिलेल्या लेखी पत्रकातून केलेली आहे .



