
साकोलीत दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव सुरूच”होय साहेब, मी ही जागा ८० हजारात घेतली” अधिकारींसमोर सत्य स्थिती आली समोर शासकीय जागेवरील दूकाने विकणा-यांची यादी बनविणे सुरू संजीव भांबोरेभंडारा- मागे साकोली शहरात तलाव सौंदर्यीकरण परीसरात तेथे दूकानांच्या मागे बसून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणा-या अनेक तळीरामांवर पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी २२ जूनला सायं. ०७ वा. धडक कारवाई केली होती. आता गडकुंभली रोड, तलाव सौंदर्य स्थळावर व तलाव शेजारी सर्विस रोडवरील मंगळवारी ता. १९ ला नगरपरिषदेतर्फे सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहिम काल ता. २० ऑगस्टलाही सुरू होती. येथे नगरपरिषद अधिकारींपुढे मोका चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला की, काहींनी या शासकीय जागेवरील ठेल्यांसह जागाच ८० हजार, १ लाखात विकल्याचे समोर आले. अश्यांची यादी बनवून दंडात्मक कारवाईची तरतूद सुरू झाली आहे. साकोली सेंदूरवाफा शहरातील सर्व्हिस रोडवर शासकीय जागेत अतिक्रमणे काढून काहींनी ती जागा भाड्याने दिली तर अनेक लोकांनी ८० हजार, ४० हजार तर १ – १ आणि ४ लाखात विकल्याचा गुन्हेगारीतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्या गैरप्रकारामुळे इतर स्वतः रोजगार करणारे गोरगरीब दूकानदारांचा या अतिक्रमण हटाव मोहिमेत नाहक बळी जात आहे असे फुटपाथ दूकानदारांचे म्हणने आहे. गडकुंभली तलाव रोडवर ( मंगळ. १९ ऑगस्टला ) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचे आदेशानुसार सर्व अतिक्रमणे ध्वस्त करण्याची मोहीम सुरू केली. याची घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता यातील किती जणांनी त्या शासकीय भूखंडावर अतिक्रमणे काढून ती जागा मोठी पगडी घेऊन भाड्याने दिली आहे. आणि कुणी कुणी स्टँम्प पेपरवर इतरांना उभारलेल्या ठेल्यासकट विकली आहेत. अश्यांची यादी तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात सायं. ०४:३७ ला एका दूकानात अधिकारी चमु गेले असता त्या दूकानदाराने सांगितले की, मी बौद्ध विहार बाजूला असणारा एका मुस्लिम व्यक्तीने ही जागा मला ८० हजारात दिली. याचा विक्री केलेला स्टॅम्प पेपरही माझ्याकडे आहे. आता माझे दूकान तर गेले पण माझे ८० हजारांचे काय.? मी पोलीस ठाणे येथे जाणार आहे असे सांगितले. तसेच बसस्थानक बाजूला गेट क्र. १ ( पश्चिम दिशेला ) एका ट्रॅव्हल्स कार्यालय धारकाने ती जागा चक्क ४ लाखात विकल्याचे समोर आले आहे. तर शहरात अनेक जणांनी विविध जागेवर मोठी पगडी घेऊन महामार्गावर महिना ४ ते ५ हजाराने भाड्याने देऊन बाहेरगावी राहत आहेत. सिव्हील वार्ड आठवडी बाजारात तर एका भाजी विक्रेत्यांनी एका बाहेरील इलेक्ट्रॉनिक व्यापारीला चक्क पंचायत समितीची जागाच ४२० फेरफार करून मोठ्या किंमतीत विकल्याची चर्चा सुरू आहे. तर अश्याच विकलेल्या व भाड्याने दिलेल्या दूकानांची यादी तयार करण्याचे धडक कार्य नगरपरिषदेतर्फे साकोली सेंदूरवाफा शहरात सुरू आहे. एकीकडे येथील साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी युवा संघटना सुद्धा आक्रमक भूमिकेत उतरली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, अगोदर ज्या ज्या लोकांनी मोठमोठे अतिक्रमणे करून त्याचा गैरवापर केला अश्यांची यादी जाहीर करा आणि अगोदर त्यांवर शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे विकल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करा. आणि येथील गोरगरीब फुटपाथ दूकानदारांची व्यथा लक्षात घेऊन शहरातील अवैध अश्लिल चाळे करण्याचे बिनकामाचे बगिच्यांवर, काहींनी धरून ठेवलेल्या शासकीय भूखंडावर व्यापारी संकुल बनवा. आणि ते गाळे स्थानिक निवासी युवा बेरोजगारांनाच प्रथम रोजगार उपलब्ध करण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी सुरू आहे. साकोलीत या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपरिषद सीओ मंगेश वासेकर यांचे मार्गदर्शनात स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता संतोष दोंतूलवार, प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे, नगर रचनाकार नितीन मेश्राम, निरीक्षक मुकेश शेंदरे, शुभम द्रुगकर, मुकेश बडोले, प्रकाश गेडाम, आनंद रंगारी, यशवंत पुस्तोडे यांच्या चमुंने मंगळवार आणि काल बुधवारी सुद्धा गडकुंभली रोड, महामार्ग सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे जेसीबी लावून काढीत जप्त करण्यात आले. ज्यांना नोटीस बजावण्यात आली व ते आले नाही अश्यांचे दुकाने जप्त केली. या सर्व नोटीसांची प्रतिलिपीत साकोली पोलीस ठाणे यांना दिलेले असून वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात सर्व शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी सांगितले. आता या संतापजनक प्रकारावर केवळ पैसे कमविण्यासाठी शासकीय जागेवर अतिक्रमणे करून त्याचा गैरवापर करून ज्या ज्या लोकांनी बेकायदेशीर विक्री केली व भाड्याने दिले आणि हा पोलीसांत गुन्हा नोंद होईल असा प्रकार करून ठेवला व आता ते पसार झाले आहेत. यांच्या या करणींमुळे येथील स्वतः जागेवर रोजगार करणारे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे स्थानिक गोरगरीब फुटपाथ दूकानदारांवर संक्रांत आली आहे. त्या सर्व होतकरू मेहनती दूकानदारांची मागणी आहे की, ज्यांनी हा फसवणूकीचा खेळ केला त्यांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई कराच पण आम्ही काही गुन्हा केलेला नाही. आम्ही जागा विकली अथवा भाड्याने दिली नाही व आम्ही जायचे कुठे.? तर शहरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या लोकांनी शासकीय भूखंड धरून ठेवले आहेत, बिनकामाचे बगिच्यांवर आणि जूने बसस्थानक जागेवर लवकरात लवकर व्यापारी संकुल उभारून तेथे आमच्या पोटापाण्यासाठी दूकाने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आता आक्रमक भूमिकेत आलेली आहे.



