
*संजीव भांबोरे भंडारा जिल्हा वार्तापत्र*स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध हातभट्टी दारूवर कारवाई एकूण 1,20000 हजार रुपयांचा गुद्देमाल जप्त भंडारा पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत आरोपी नामे राहुल परसराम शेंडे वय 35 वर्षे राहणार पाथरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथील फिर्यादी यांनी रेड केली असता नमूद आरोपी हा मोजा आष्टी शेतशिवार वीजपडी बोडलगतलगत आष्टी तालुका तुमसर जिल्हा भंडारा मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील 20 प्लास्टिक चुंगड्यांमध्ये प्रत्येकी 30 किलो ग्रॅम प्रमाणे 600 किलोग्राम सर्व मोहाफुल किंमत 1,20000/रुपयाचा अवैध गुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 295/2025 कलम 65 फ म दा का नुसार सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाटील स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गोबरवाहीचे अधिकारी करीत आहेत.



