
हर्सूलमध्ये पुन्हा पाडापाडी! सोमवारपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात 🚧
➖➖➖➖➖
🌟 आता तुमच्या WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻
➖➖➖➖➖
🛣️ छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. सोमवार, २८ जुलैपासून तिसऱ्या टप्प्याची मोहीम हर्सूलपासून सुरू होणार आहे.
📌 मागील काही दिवसांत मनपाच्या नगर रचना विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवर मार्किंग केली होती. काही जागाधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढले असले तरी आता उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका थेट कारवाई करणार आहे.
🚜 सोमवारपासून हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंपापर्यंत ६० मीटर रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. यानंतर क्रमशः इतर रस्त्यांवरही टप्प्याटप्प्याने पाडापाडी केली जाणार आहे.
🛣️ रस्ता रुंदीकरणाची रूपरेषा अशी आहे :
- हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंप : ६० मीटर
- नारेगाव रोड : ३० मीटर
- सेवनहिल ते सूतगिरणी चौक : ३० मीटर
- सूतगिरणी चौक ते शहानूर मिया दर्गा चौक : २४ मीटर
- भाजीवालीबाई चौक ते आनंद गाडे चौक : २४ मीटर
- महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते मिल कॉर्नर : ३५ मीटर
- कॅन्सर हॉस्पिटल ते दिल्लीगेट : ३५ मीटर
📣 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि वेळेत स्वतःहून अतिक्रमण हटवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖
📢 पुढील अपडेट्स लवकरच..! पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!
🤳🏻 जाहिरात करण्यासाठी संपर्क : 9921037771